वजन कमी करायचं ? मग करा योगसाधना |

घडाळ्याच्या काट्यावर चालणारी आजची ‘बिझी पिढी’ वजनाच्या काट्यावर चढली की त्यातील अनेकांना घाम फुटतो ! कारण नियंत्रणात नसणारे वजन मग ती अडकते महागड्या जिम्स आणि विचित्र डाएच्या चक्रात, या साऱ्यातून बाहेर पडण्यासाठी आणि घरच्या घरी वजन कमी करण्याचा अगदी माफक आणि सोपा उपाय म्हणजे योगा… मग पहा तुमचं वजन आटोक्यात ठेवणारी ही काही योगासन …… Also Read – घाम न आल्यास व्यायामाचा फायदा होत नाही का ?

Also Read – या ‘५’ योगासनांनी मरगळ झटकून चटकन फ्रेश व्हा !

१) अर्ध चंद्रासन Also Read – व्यायामानंतर केलेल्या या ‘५’ चुकांमुळे वजन कमी होत नाही !

अर्ध चंद्रासनामुळे मांड्या , पार्श्वभागावरील अतिरिक्त चरबी कमी होते. तसेच पोटाच्या घेरातील चरबी कमी कमी होण्यास मदत होते.

अर्ध चंद्रासन कसे कराल ?

– सावधान स्थितीत उभे रहा .

– दोन्ही हात जोडून सरळरेषेत वर करा.

– त्यानंतर कंबरेत वाकून एका बाजूला झुका.

– थोड्या वेळाने श्वास सोडा आणि पूर्वस्थितीत या.

– पुन्हा दुसऱ्या बाजूला वाका.

( #टीप- जर तुम्हाला उच्च रक्तदाब ,मणक्यांचे आजार किंवा पचनाचे विकार असतील तर अर्ध चंद्रासन करणे टाळा.)

२) वीरभद्रासन

वीरभद्रासन तुमच्या मांड्या , पार्श्वभाग , पाठ व पोटावर ताण देते त्यामुळे वजन व चरबी कमी होण्यास मदत होते.

कसे कराल वीरभद्रासन ?

– विश्राम स्थितीत उभे रहा

– दोन्ही हात बाजूला सरळरेषेत ठेवा

–  पाऊल उजव्या बाजुला सरळ करून कंबरेतून उजव्या बाजूला वळा .

– गुडघ्यात वाका आणि हात सरळ रेषेत वर करत जोडा

– काही काळ ह्याच स्थितीत रहा

– हळूहळू पूर्वस्थितीत या आणि हीच कृती डाव्या बाजूला करा.

(# टीप- जर तुम्हाला उच्च रक्तदाब , पाठ,गुडघे ,खांद्याचे दुखणे असेल तर वीरभद्रासन करणे टाळा. तसेच हे योगासन मार्गदर्शनाखाली करा. ) 

३) वीरभद्रासन २

वीरभद्रासन २ हे पहिल्या आसनाचा दुसरा भाग आहे . तो तुमच्या मांड्या , पार्श्वभाग ,हृदयाला मजबूत करतात.

कसे कराल वीरभद्रासन ?

– विश्राम स्थितीत उभे रहा

– दोन्ही हात बाजूला सरळरेषेत ठेवा

– उजवे पाऊल सरळ करा आणि गुडघ्यात वाका

– हात सरळ रेषेत ठेवा , नजर समोर राहू द्या

– काही काळ ह्याच स्थितीत रहा

– हळूहळू पूर्वस्थितीत या आणि हीच कृती डाव्या बाजूला करा.

( #टीप- जर तुम्हाला उच्च रक्तदाब , पाठ,गुडघे ,खांद्याचे दुखणे असेल तर वीरभद्रासन करणे टाळा. तसेच हे योगासन मार्गदर्शनाखाली करा.)

४) उत्कटासन

उत्कटासन मांड्या , पार्श्वभाग व स्नायुंना बळकटी देते. उत्कटासन हे खुर्ची आसनाच्या स्वरूपात केले जाते.

  • कसे कराल उत्कटासन?

– दोन्ही पाय जोडून थोडे गुडघ्यात वाका

– दोन्ही हात जोडून वर सरळ रेषेत ठेवा नजरही वर राहू द्या.

– खांदे खाली झुकू द्या

– काही काळाने हात मोकळे करू शकता.

 ५) वृक्षासन 

वृक्षासन स्थिरता आणि मजबुतीसाठी उपयुक्त आसन आहे. या आसनामुळे पोटाजवळील स्नायुंसाठी तसेच दंड आणि मांड्यातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते.

  • कसे कराल वृक्षासन ?

– दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवून उभे रहा.

– हळूहळू एका पायावर भार देत दुसरा पाय गुडघ्यात वाकवून पहिल्या पायाच्या आतील भागावर ठेवा.

– दोन्ही हात जोडून छातीजवळ ठेवा .

– कोणत्याही वस्तुचा आधार न घेता शक्य तितक्या वेळ उभे राहण्याचा प्रयन्त करा.

(#टीप – जर तुम्ही गुडघे किंवा पाठ दुखीने त्रस्त असाल तर हे आसन मार्गदर्शनाखाली करा.)

६) उत्तनासन 

उत्तानसनामुळे पोटावरील स्नायूंवर ताण येतो. यामुळे मेंदूतील रक्तप्रवाह सुधारतो व प्रसन्न वाटण्यास मदत होते.

  • कसे कराल उत्तनासन?

– सावधान स्थितीत उभे रहा व दोन्ही हात कंबरेवर ठेवा.

– दीर्घ श्वास घ्या व कंबरेतून खाली वाका.

– त्यानंतर दोन्ही हात जमिनेवर ठेवा

– काही काळ याच स्थितीत रहा व हळूहळू पूर्वस्थितीत या .

सूर्य नमस्कार

सुर्यनमस्कार हा योगासनातील सर्वश्रेष्ठ आसनप्रकार आहे कारण या एका योगासनात अनेक इतर योग प्रकारांचा समावेश आहे. सूर्य नमस्कारामुळे वजन घटवण्यास मदत होते. सूर्यनमस्कार नियमित केल्याने व्यक्तीचे स्वास्थ्य निरोगी व तजेलदार होते.सूर्य नमस्कारामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.

८) अर्धमस्येंद्रासन

अर्धमस्येंद्रासन फुफ्फुसाची क्षमता वाढवते . त्यामुळे अधिकाधिक ऑक्सिजन शरीरात घेतला जातो. यामुळे मणक्यातील,मांड्यातील तसेच पोटावरील स्नायूंवर ताण येउन वजन कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे पचनशक्ती सुधारते , अन्न अधिक चांगल्याप्रकारे पचते व वजन घटण्यास मदत होते.

– दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवून ताठ बसा

– उजवा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या पायाच्या बाहेरील बाजूस ठेवा आता डावा पायही दुमडा.

– हळूहळू डावा हात उचलून तो उजव्या पायाच्या घोट्याजवळ ठेवा

– त्यानंतर तुमचा खांदा , मान मागे वळवून हात कंबरेत घाला.

९) बद्धकोणासन

बद्धकोणासन मांडीच्या आतील भागातील मेद कमी करते व मणक्यांना मजबूत करते तसेच गुडघ्यातील , मांडीचे व कंबरेच्या खालील स्नायू मजबूत करते. या आसनामुळे मासिक पाळीदरम्यानचा त्रास कमी होतो,पचनक्रिया सुधारते.

  • कसे कराल बद्धकोणासन?

– दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवून जमिनीवर बसा

– त्यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून टाचा तुमच्याजवळ घ्या

– तुमचे हात पायांच्या बोटांजवळ ठेवा आणि पायांच्या मांड्या फुलपाखरांच्या पंखाप्रमाणे वर खाली हलवा .

(#टीप-तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असल्यास बद्धकोणासन करु नये.)

१०) कपालभाती प्राणायाम

कपालभाती हा श्वसनाचा व्यायाम आहे. यामुळे शरीराला पूरक प्राणवायू मिळतो . तसेच पोटाच्या स्नायूंची शक्ती वाढते . यामुळे पचनशक्ती वाढते तसेच पोटावरील चरबी कमी होते.

  • कसा कराल कपालभाती प्राणायाम?

– जमिनीवर खाली बसा,पाठीचा कणा ताठ ठेवा व हात गुडघ्यावर ठेवा

– आता श्वास बाहेर सोडा आणि पोट पाठीच्या कण्याकडे खेचण्याचा प्रयन्त करा

– तुम्ही पोटाचे स्नायू ढिले सोडल्यास आपोआप श्वास घेऊ शकाल

– पुन्हा श्वास बाहेर टाकून पोटाचे स्नायू आत घ्या.

– सुरवातीला हे ५० वेळा करण्याचा प्रयन्त करा व हळूहळू मात्रा वाढवा

( #टीप – हृदयरोगी , उच्च रक्तदाब व हर्नियाच्या रोगींनी कपालभाती करणे टाळावे .)

११) कुंभकासन

कुंभकासन तुमच्या पाठीचे , पार्श्वभागाचे , खांदे व दंडाचे स्नायू मजबूत करतात.

  • कसे कराल कुंभकासन?

– दोन्ही गुडघे व हाताचे पंजे जमिनीवर ठेवा व इतर शरीर जमिनीपासून वर ठेवा

– त्यानंतर पाय सरळ करत केवळ पायाच्या बोटे जमिनीवर ठेवा

– नजर जमिनीकडे ठेवा , पाठीचा कणा पायांच्या रेषेत सरळ ठेवा

– कुंभकासन ३० सेकेंद ते मिनिटभरासाठी ठेवा

(#टीप – जर तुम्हाला खांद्याचे , पाठीचे दुखणे असल्यास तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास कुंभकासन टाळा.)

 12) हलासन

खूप काळ बैठकीचे काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हलासन अतिशय उपयुक्त आहे. यामुळे पाठदुखी आणि कंबरदुखी दूर होते. वात विकारावर या आसनाचा चांगला फायदा होतो. पोटातल्या अवयवांवर दाब आल्याने बद्धकोष्ठता , अॅसिडिटी कमी होते व पचनशक्ती सुधारते. मधुमेहाला प्रतिबंधक म्हणून या आसनाचा उपयोग होतो.

  • कसे कराल हलासन ?

– जमिनीवर पाठीवरती झोपावे.

– नंतर दोन्ही पाय एकमेकांना जोडा व दोन्ही हातांचे पंजे जमिनीला लावून ठेवावेत.

– आता श्वास हळूहळू बाहेर सोडावा. यानंतर दोन्ही पाय सावकाश वर उचला.

– गुडघे सरळ रेषेत ठेवत, पाय आकाशाच्या दिशेने उंच उचलावेत.

– पायांना हळूहळू डोक्याच्या मागे नेण्याचा प्रयत्न करावा.

व्हिडियो सौजन्य – onsugar.com, cnyhealingarts.com, smilingdogblog.com, yogapilates.it, artofliving.org, yogasanatraining.com, yogalifejourney.com,

छायाचित्र सौजन्य – Getty Images

Published : March 5, 2015 10:45 am | Updated:January 4, 2017 9:13 pm


Source

RELATED POST